जामनेर पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडी करणारे दोन चोरटे गजाआड, चोरीची रोख रक्कम व दुचाकी जप्त

जामनेर पोलिसांची

जळगाव (संपादक सुनील पाटील) | जिल्ह्यातील जामनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने एका घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत अवघ्या काही दिवसांत दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीला गेलेली ७० हजार रुपयांची संपूर्ण रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली विना क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जून २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरातून ७०,००० रुपयांची रोकड चोरीला गेली होती. याप्रकरणी त्याच दिवशी रात्री २१:५९ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर ३१०/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(a) आणि ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.

गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढत दोन सराईत आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत: १. आरीफखान लालखान कंजर (वय २५ वर्षे, रा. सोनारी, ता. जामनेर, जि. जळगाव) २. मुबारीक अली खान (वय २० वर्षे, रा. केरपाणी, ता. नेपानगर, जि. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश)

आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी गेलेली ७०,००० रुपयांची रोख रक्कम आणि गुन्ह्यासाठी वापरलेली विना नंबर प्लेटची काळी स्प्लेंडर मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केली आहे.

ही यशस्वी कारवाई तपास अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल (पोहेकॉ) संजय खंडारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या तपास मोहिमेत त्यांना पोहेकॉ राजू तायडे, पोलीस कॉन्स्टेबल (पोकॉ) सचिन महाजन आणि पोकॉ उज्ज्वल जाधव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जामनेर पोलिसांच्या या अत्यंत वेगवान आणि तत्पर कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक होत असून समाधानाचे वातावरण आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here