पिंपळनेर येथे श्री सगरवंशीय समाज व जिरे माळी समाज सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववानांचा भव्य गौरव सोहळा उत्साहात संपन्न

सगरवंशीय समाज

नगर (प्रतिनिधी) | श्री सगरवंशीय समाज शिक्षण प्रसारक संस्था, धुळे आणि महाराष्ट्र राज्य जिरे माळी समाज सेवा संघ, धुळे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळनेर येथे आयोजित करण्यात आलेला ‘गुणगौरव सोहळा – २०२६’ अतिशय उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. समाजातील दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या सुमारे ३५० गुणवंत विद्यार्थ्यांचा, एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून पुरस्कार प्राप्त केलेल्या मान्यवरांचा तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. ज्ञानेश्वर (नानासाहेब) गोविंदराव एखंडे हे होते. उद्घाटन नारायणजी धोंडू नवले यांच्या हस्ते करण्यात आले, तर चंद्रकांतजी बागुल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलनाने झाले.

या भव्य सोहळ्याला अनिल जाधव, प्रा. डी. टी. पाटील, काशिनाथ नंदन, नारायण मानकर, प्रकाश पाटील, सौ. सुशिलाबाई गवळी, डिगंबर क्षीरसागर, मुकुंद घरटे, किशोर घरटे, अविनाश सोनवणे, सुभाष नंदन, कैलास जिरे, माधुरी साळवे, निलेश पगारे, सतीश शिरसाठ, मधुकर साळवे, केदा जाधव, ह.भ.प. प्रा. रामचंद्र महाराज नंदन, दामोदर पगारे, सौ. शालिनीताई बुंदे, सौ. कविताताई क्षीरसागर, रावसाहेब घरटे, अशोक साळवे, गजानन साळवे, महेश घरटे, मोहन महाजन, निंबा जाधव, दीपक जाधव, डॉ. राजेंद्र पगारे, कमलाकर क्षीरसागर, आर. बी. जिरे, प्रा. एम. एच. पाटील, विजय पाटील, सुदाम पगारे, किरण पगारे, चेतन पगारे, आण्णा सोनवणे, वसंत वाघ यांच्यासह धुळे जिल्हा व परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, प्रशासकीय सेवेत उच्च पदे भूषवून समाजाचे नाव राज्यभर उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. “शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन असून, नव्या पिढीने ज्ञान, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे,” असे विचार वक्त्यांनी व्यक्त केले.

समाजहिताची भावना जपत अॅड. नानासाहेब ज्ञानेश्वर एखंडे यांनी या भव्य गुणवंत गौरव सोहळ्यासाठी आपले ‘साई कृष्णा लॉन्स’ चे सभागृह विनामोबदला उपलब्ध करून दिले. त्यांच्या या उदार व समाजाभिमुख योगदानाबद्दल उपस्थित सर्व समाजबांधवांनी विशेष कौतुक करत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी धिरज पाटील, दत्तात्रय पगारे, हेमंत घरटे, निलेश पाटील, नरेश जाधव, आर. जे. पाटील, विजय पगारे, जगन्नाथ सोनवणे, प्रभाकर पगारे, मधुकर पगारे, किरण रायते, कैलास रायते, श्रीकृष्ण सावळे, अमित नंदन, बापू जाधव, रविंद्र साळवे, डी. पी. पाटील, अमोल क्षीरसागर, संजय पारसकर, कविता क्षीरसागर, दिनेश पाटील, योगेश पगारे, तुषार गवळी आणि ज्ञानेश्वर भोगे आदींनी अत्यंत परिश्रमपूर्वक उत्तम नियोजन केले.

समाजातील गुणवंतांचा सन्मान करून नव्या पिढीला शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि प्रगतीची प्रेरणा देणारा हा सोहळा उपस्थित समाजबांधव, पालक, शिक्षक, विद्यार्थी, महिला-पुरुष आणि पत्रकार बंधूंच्या स्मरणात राहील, अशा आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here