कायदा व सुव्यवस्थेसाठी चोपडा पोलिसांची ‘दंगा काबू’ रंगीत तालीम

चोपडा पोलिसांची

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | शहरात अचानक निर्माण होणारी दंगलसदृश परिस्थिती, जातीय तणाव किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तात्काळ आणि प्रभावीपणे हाताळण्यासाठी चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आज ‘दंगा काबू योजना’ (मॉक ड्रिल) यशस्वीरीत्या राबविण्यात आली. पोलीस प्रशासनाने तयार केलेले आपत्कालीन नियोजन आणि विशेष कृती दलाच्या माध्यमातून ही रंगीत तालीम पार पडली.

शहरात कुठेही दंगल किंवा हिंसाचाराची परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचून गर्दीवर कसे नियंत्रण मिळवावे, याचे प्रात्यक्षिक या मोहिमेत करण्यात आले. या सरावादरम्यान पोलीस दल, अग्निशामक दल (Fire Brigade) आणि वैद्यकीय पथक (Medical Team) यांच्यात उत्तम आपत्कालीन समन्वय साधण्यात आला. तसेच शहरातील संवेदनशील भाग, महत्त्वाच्या शासकीय आस्थापना आणि सार्वजनिक ठिकाणांना सशस्त्र सुरक्षा कवच पुरवण्याबाबतही सराव करण्यात आला.
या रंगीत तालमीसाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले तरुण पोलीस अधिकारी व अंमलदार सज्ज होते. या पथकामध्ये लाठी सेक्शन, अश्रुधूर (Tear Gas) पथक, ढाल सेक्शन आणि दंगल नियंत्रण शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेले जवान सहभागी झाले होते.
सदर दंगा काबू योजनेच्या रंगीत तालमीवेळी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO – चोपडा) यांच्या प्रमुख उपस्थितीत ५ पोलीस अधिकारी आणि ३६ पोलीस अंमलदारांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून नियोजनाची यशस्वी चाचपणी केली.को णतीही अनुचित घटना घडल्यास पोलीस प्रशासन तत्परतेने कारवाई करण्यास पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास या वेळी पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here