जळगाव (निलेश पाटील) – निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान,फ़ूड बैंकतर्फे रस्त्यावरील निराधार आजी-आजोबाना जेवण देण्याचे कार्य अविरतपणे सुरु आहे. आजचे जेवण नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचे समाजसेवक व निष्ठावंत सदस्य धनंजय अशोक सोनवणे यांच्याकडून वडिलांच्या श्राद्धानिमित्त देण्यात आले होते. रस्त्यावरील निराधार आजी-आजोबाना ह्या जेवणाचे वाटप करण्यात आले . जेवण वाटपप्रसंगी प्रतिष्ठानचे धनंजय सोनवणे, धीरज जावळे व सुलतान भैया पटेल उपस्थित होते.







