दिव्यांग गणेशला मिळाली मदतीची ‘समान संधी’; ‘श्री समर्थ कृपा’ बचत गटातर्फे तीन चाकी सायकल भेट

श्री समर्थ कृपा

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) । चाळीसगाव येथील एका दिव्यांग गरजू तरुणाला स्वावलंबनाचे बळ मिळावे, या उद्देशाने ‘श्री समर्थ कृपा अपंग महिला बचत गटा’च्या पुढाकाराने त्यांना तीन चाकी सायकल भेट देण्यात आली. जळगाव येथील सिंधी कॉलनी रोडवरील शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्र येथे नुकताच हा कार्यक्रम पार पडला.

सोमवारी, १७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात, मुकुंदभाऊ गोसावी यांच्या हस्ते चाळीसगाव येथील रहिवासी असलेल्या दिव्यांग गणेश यांना तीन चाकी सायकल सुपूर्द करण्यात आली. या सायकलमुळे आता गणेश यांच्या दैनंदिन प्रवासातील अडथळे दूर होऊन त्यांना काही प्रमाणात स्वावलंबन मिळणार आहे.
याप्रसंगी गणेश पाटील, दत्तात्रय महाजन यांच्यासह शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्रातील अनेक दिव्यांग विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशा पाटील, सचिन पाटील, किशोर नेवे, जितेंद्र पाटील आणि प्रवीण भोई यांनी विशेष परिश्रम घेतले. महिला बचत गटाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here