ज्योती अनंत भोळे यांचे अल्पशा आजाराने निधन

ज्योती अनंत भोळे

जळगाव (प्रतिनिधी) | ‘मृदंग इंडिया’ या जाहिरात संस्थेचे संचालक तसेच रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे माजी अध्यक्ष अनंत भोळे यांच्या पत्नी सौ. ज्योती अनंत भोळे (वय ४९) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी रात्री उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले असा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता त्यांचे राहते घर ‘भगीरथ कॉलनी’ येथून निघून नेरी नाका येथील वैकुंठधाम स्मशानभूमीमध्ये नेण्यात येणार असून तेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here