गाढविणीचे दूध ५००० रु. लिटर ?

(यशवंत चव्हाण सीबीडी बेलापूर)
गाय,म्हैस,बकरी यांचे दूध किती आणि कोणत्या प्रमाणात पोषक आहे याची जाणीव प्रत्येकाला असतेच.त्याची किंमतही त्या अनुषंगाने ठरवली जाते.वाघिणीचे दूध किती शक्तिशाली असते किव्वा मिळते हे माहित नाही पण त्याच उदाहरण असामान्य शारीरिक कर्तृत्व गुंडांवर मात करणाऱ्या व्यक्ती,पैलवान व महिलेबाबत केले जाते.व पलटवार झालाच अपयश आले तर त्याच व्यक्तींना काय गाढविणीचं दूध प्यायला वाटत असे हेटाळणीयुक्त स्वरात संभावना व अपमानित केले जाते. निमूट खाली मान घालून ओझी वाहणारा व टीकेचा धनी असलेला गाढव व गाढवीण आता घोड्याच्या ऐटीत वागतील. हरियाणाच्या हिस्सार ह्या भागात हलारी जातीच्या गाढवीणीना सोन्याचे आणि मानाचे दिवस सुरु झाले.गाढविणीच्या दुधात पोषक तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे घटक आहेत.तूर्त दहा गाढविणीमार्फत दूध काढले जाऊन त्याची किंमत 5000 रु. लिटर ठरवण्यात आली आहे.एवढे महाग दूध कोणी विकत घेईल काय ? घेतले विकत आणि प्यायले तरी सांगण्याची हिम्मत दाखवली तर त्यांच कौतुक व श्रीमंतीत गणले जाईल कि हेटाळणी करतील हा येणार काळच ठरविलं तूर्त प्रत्येक पशु किती उपयुक्त आहे ह्याच हे ढळढळीत उदाहरण.आपल्या देशात जस अघटित घटना घडतात तश्या अचंबित करणाऱ्याही घडतात हे आपल्या देशाचं खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here