वसंतनगर येथे महावितरण कंपनीचा मनमानी कारभार ; निकृष्ट दर्जाचे कामामुळे नागरिकांच्या जिवाला धोका

वसंतनगर

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | पारोळा तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे मागील काही दिवसांपासून महावितरण कंपनीकडून गावात केबल टाकण्याचे काम सुरू आहे. या केबल टाकण्यासाठी ते मनमानी कारभार करत असून गावातील लोकांना धमकावून काम करीत आहेत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावात कोणतीही पुर्व सुचना न देता जुने वायर आपल्या मनमर्जीने काढण्यात येत आहे. यामुळे आर्धे गाव अंधारात आहे. सध्या परिस्थितीत गावात मोजकेच विद्युत मिटर आहेत. नवीन मिटर घेण्यासाठी लोकांना कोणतीही पुर्व सुचना न देता महावितरणाचे अधिकारी व कर्मचारी गावात येऊन लोकांना धमकावतात तसेच पोलिसांची धमकी देऊन त्यांच्या गल्लीतील विद्युत पुरवठा खंडित करित आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, महावितरण कंपनीने लोकांना धमकावू नये तसेच लोकांना सहकार्य करून नवीन विज कनेक्शन जोपर्यंत मिळत नाही. तोपर्यंत गावातील जुने वायर व कनेक्शन बंद करू नये तसेच यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून गावातील शेतकरी पहिलेच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांना नवीन कनेक्शन घेणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना नवीन कनेक्शन व डिमांननोट महावितरण कंपनीने आपल्या खर्चातून देण्यात यावे तसेच गावातील कोणत्याही गल्लीतील विद्युत पुरवठा खंडित न करावे, असे झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
तसेच गावात सध्या केबल टाकण्यासाठी नवीन खांब गाडण्यात आले असून ते खांब साधारणता फक्त एक फुट खोल गाडण्यात आले आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरला विचारले असता त्याने सांगितले की आम्हाला महावितरण कंपनीने जिथे कडक जागा आहे. तेथे फक्त एक ते दीड फूट खोदून खांब उभे करावे असे निर्देश दिले आहे. आपण महावितरण अधिकारी ला विचारा असे उडवाउडवीची उत्तरे ही दिली, खरे तर हे काम पुर्णतः निकृष्ट दर्जाचे असून यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका आहे. त्यातील काही खांब आताच वाकडे झाले आहे. तर काही खांबाना ताणही दिलेला नाही, यामुळे पुढील काळात हे खांब जोरदार हवा पाण्यात पडतील आणि यामुळे गावात जिवीतहानी होण्याची शक्यता जास्त आहे. अशी गावकऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. हे सर्व खांब महावितरण कंपनीने लवकरात लवकर खोल खड्डे खणून गाडावे नाहीतर पुढे काम करू देणार नाही. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तर, मागील काही दिवसांपासून गावात अनेक भागात केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले असून जुनी वायर महावितरण कंपनीकडून खांबावरून उतरविण्यात येत आहे. ती वायर संपुर्ण गावात मिटर बसत नाही. तोपर्यंत काढू नये त्याबद्दल गावातील लोकांना पुर्व सुचना द्यावे असे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण कंपनीची राहील असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here