जळगाव – जुन्या भगवाननगरातील दीप सुरेश रावतोडे (वय १५) या बालकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी साडेसात वाजता उघडकीस आले. दीप हा आता दहावीच्या वर्गात जाणार होता.
दीपला सकाळी झोपेतून उठवण्यासाठी आवाज दिला. परंतु, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यास उठवण्यासाठी आई गेली मात्र, त्याची रुम आतून बंद होती. बराच वेळ आवाज देवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने शेजारच्यांच्या मदतीने त्याच्या आई, वडिलांनी दरवाजा तोडला तर दीपने पंख्याख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसले. याबाबत दीपचे काका चंदू तुकाराम रावतोडे यांनी खबर दिली. त्यावरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद झाली. तपास हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे करीत आहेत.






