आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम

आर. आर. विद्यालयात

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) | येथील आर. आर. विद्यालयात आज नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अत्यंत उत्साही आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या विशेष कार्यक्रमात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत एकत्र येत गरब्याचा तुफान आनंद घेतला.

 

​कार्यक्रमाची सुरुवात अतिशय भक्तिमय वातावरणात झाली, तसेच आठवीच्या  विद्यार्थिनीनी सुस्वर आवाजात ‘दुर्गा स्तोत्र’चे पठन करून उपस्थितांचे मन जिंकले. या धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात चैतन्य निर्माण झाले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या या उत्साहात विद्यालयातील महिला शिक्षिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांसोबत गरबा खेळला, ज्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आपुलकीचे व आनंदाचे एक सुंदर दृश्य पाहायला मिळाले. संपूर्ण विद्यालयात उत्साहाचे आणि आनंदाचे भरती आलेले वातावरण निर्माण झाले होते.

​हा सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमान गिरीष आर भावसार आणि शिक्षक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. श्रीमान डी. डी. जोशी, व्ही. एस. रोकडे, टी. बी. पांढरे, जे. एम. पाटील, आर. एम. पाटील, डी. एस. साबळे, एस. एम. देवराज आणि एस. एन. चौधरी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here