आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

वाचन प्रेरणा दिन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | स्थानिक आर. आर. विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

 

​कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक गिरीष आर भावसार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक संजय पिले, किशोर सोनवणे, गिरीष महाजन, अपर्णा वाणी यांची उपस्थिती होती. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. एम. देवराज यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात डॉ. कलाम यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत वाचनाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले.

​या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर व विचारांवर अभ्यासपूर्ण भाषणे सादर केली. यानंतर आर. एम. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “पुस्तके ही आपली खरी मित्र असतात. डिजिटल युगातही वाचनाची सवय कायम ठेवणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन केले.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डी. बी. पांढरे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्याचे आवाहन केले. “वाचनामुळे विचारांची प्रगल्भता वाढते आणि माणूस घडतो. डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रत्येकाने अवांतर वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे,” असे मत त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

​सदर संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर व सूत्रबद्ध सूत्रसंचालन कु. चैताली भारुळे हिने केले. कार्यक्रमाच्या शेवटी कु. अनन्या साबळे हिने उपस्थित सर्वांचे आभार मानले. ​या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here