हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जळगावात शिवसैनिकांतर्फे भावपूर्ण आदरांजली

बाळासाहेब ठाकरे

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) |  हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जळगाव येथील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात शिवसैनिकांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी बाळासाहेबांचे प्रखर विचार आणि समाजसेवेचा वसा अखंडपणे पुढे नेण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला.

 

या अभिवादन कार्यक्रमास शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र सचिव जितेंद्र गवळी, सागर गवळी, दीपक पाटील, चेतन तांबोळी, अनिकेत बोराडे, काशी मस्के, अमोल जगताप, शुभम गवळी, मोहीत जोशी, क्रिश सनकत, विजय भाटी यांच्यासह असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here