धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी. पाटील) – येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य डॉ. किशोर पाटील यांची प्रोफेसर पदासाठी नुकतीच निवड झाली.
गेल्या तीन दशकांपासून मराठी विभागात कार्यरत असलेले प्रा. डॉ. किशोर मंगेश पाटील हे 2005 पासून विभाग प्रमुख आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर विभाग असावा म्हणून गेल्या तीन वर्षांपासून एम. ए. मराठीचे विनाअनुदानित वर्ग सुरू केले. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी त्यांनी मराठी भाषा दिनानिमित्त निरंतर वाचन स्पर्धा गेल्या वर्षांपासून घेत आहेत.सहकारी प्राध्यापकांच्या मदतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने सिंगापूर, मलेशिया, थायलंड, मॉरिशस सारख्या विदेशात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करुन त्यांनी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भूमीबोल यासारख्या जागतिक विभूतीच्या विचार, आचार आणि कार्य याविषयी विचार मंथन घडवून आणले. मराठी साहित्याच्या संदर्भात विविध विषयांवर आंतरराष्ट्रीय जनर्लसमध्ये डॉ किशोर पाटील यांचे संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत. विद्यापीठाच्या पदवीस्तरावरील अभ्यासक्रमावर आधारित अनेक पाठ्यपुस्तकांचे त्यांनी लेखन केले असून एम पी एस. सी व तत्सम स्पर्धा परीक्षा आणि मराठी वाड्मयविषयांच्या संदर्भ ग्रंथाची त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
खान्देशातील विधीनाट्य म्हणून लळित या लोकनाट्यांचे प्रयोग अलिकडच्या काळात अंस्तगत होत चालले आहेत. ही लोकपरंपरा लोक संस्कृतीची परंपराआहे. खान्देशातील या या लोकपरंपरांच्या संदर्भात डॉ किशोर पाटील यांनी लळितांवर संशोधन केलेल्या प्रबंधावर विद्यापीठाने त्यांना विद्यावाचस्पती अर्थात पीएच.डीची पदवी देऊन गौरव केला आहे.
विद्यार्थी केंद्रित शिक्षणाचा पुरस्कार करताना अखिल मानवतेच्या संदर्भात बंधुभाव असावा याविषयी विविध दैनिकात वैचारिक लेखन करताना तळागाळातील माणसाची भाषा व्यवसायाभिमुख व्हावी म्हणून त्यांनी अनेक प्रकल्प लेखन केले आहे.
धरणगाव महाविद्यालयाला प्रोफेसर पदाचा मान प्रथमच मिळत असल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ अरुण कुलकर्णी, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजय पगारीयांसह सर्व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक करुन अभिनंदन







