चोपडा शहरात विना मिरवणूक व वाद्य श्रींचे विसर्जन

चोपडा नगरपालिकेतर्फे करण्यात आले गणेशमुर्तीचे संकलन

चोपडा (तालुका प्रतिनिधी संदीप ओली) – शहरात गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी श्रींचे विसर्जन होत असते.प्रत्येक वर्षी धूमधडाक्यात साजरा होणारा वैभवशाली गणेशोत्सव यंदा मात्र कोरोनाच्या सावटाखाली शांततेत पार पडला. पोलिसांनी गणेशोत्सव मंडळासाठी जाहीर केलेल्या नियमानुसार सर्व सार्वजनिक मंडळानी कुठलीही मिरवणूक न काढता तसेच वाद्य न वाजवता शांततेत श्रींचे विसर्जन केले.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रथमच चोपडेकरांनी हे अनुभवले.विसर्जन मिरवणुकीला पुर्णतः बंदी होती.दरवर्षी चोपडा शहरात विसर्जन मिरवणुकीला आगळेवेगळे महत्त्व असते व सदर मिरवणूक मध्यरात्रीपर्यंत सुरू असते पण यावर्षी अगदी शांततेत दुपारी एक वाजेपर्यंत सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.विस

 

र्जनाच्या पार्श्वभुमीवर पोलिस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यात उपविभागीय पोलिस अधिकारी सौरभ अग्रवाल,पोलीस निरिक्षक संजय ठेंगे,सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोज पवार,पोलिस नाईक विलेश सोनवणे यासह अनेक पोलीस कर्मचारी गस्त घालून होते.
तसेच श्रींच्या मूर्तीचे संकलन करण्यासाठी चोपडा नगरपालिकेतर्फे दहा ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली होती.शहरातील प्रत्येक भागात सदर ट्रॅक्टर जाऊन श्रींचे संकलन करून विसर्जनाचे कार्य चोपडा नगरपालिका तर्फे करण्यात आले.याप्रसंगी उपनगराध्यक्ष भुपेंद्रभाई गुजराथी,गटनेते जिवनभाऊ चौधरी,नगरसेवक हितेंद्र देशमुख,रमेश शिंदे,हुसेन पठाण,कैलास सोनवणे,गजेंद्र जैस्वाल तसेच आरोग्य निरिक्षक व्हि.के.पाटिल आदि उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटकाळात अगदी शांततेत श्रींना निरोप देण्यात आला.कोरोनाचे संकट लवकर दुर व्हावे व पुढील वर्षी नव्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्याचे गणेशभक्तांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here