जळगाव – येथील भाजपाचे माजी खासदार ,माजी आमदार, जळगाव जिल्हा भाजपा अध्यक्ष स्व.हरिभाऊ जावळे यांना जळगाव जिल्ह्यातील सर्व भाजपा लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने ऑनलाईन श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे .
दि. 19 जून 2020 शुक्रवार रोजी सकाळी ठीक 10 वाजता ऑनलाइन पद्धतीने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या ऑनलाइन श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या श्रद्धांजली सभेमध्ये सर्वप्रथम स्वर्गीय हरिभाऊंना शांती मंत्र म्हणून ,श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल .त्यानंतर खा.रक्षाताई खडसे, खा. उन्मेष पाटील, एकनाथराव खडसे, आ.गिरीश महाजन, योगेश्वरजी गर्गे ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रतिनिधी ), चंद्रकांत दादा पाटील (प्रदेश अध्यक्ष भाजप) आदी मान्यवरांचे श्रद्धांजली दोन शब्द बोलतील.
ऑनलाइन श्रद्धांजली सभेसाठी एक लिंक पाठविण्यात येणार असून, .19 जून 2020 ला सकाळी ठीक 10 वाजता ही लिंक आपण ओपन करावी. ओपन केल्यानंतर वाच लाईव्ह या बटन वर क्लिक करावे म्हणजे आपल्याला या ऑनलाइन श्रद्धांजली सभेमध्ये सहभाग घेता येईल. तरी या श्रद्धांजली सभेमध्ये हरिभाउंवर प्रेम करणारे हितचिंतक आणि नागरिक सहभागी व्हावे, असे आवाहन ऑनलाईन श्रध्दांजली सभेचे संयोजक प्रा.डॉ. सुनील नेवे यांनी केले आहे.






