अपुऱ्या मनुष्यबळामुळे कोरोना संकटात वाढतोय पोलिसांवरचा ताण – पोलीस बॉइज असो.ची मागणी

पुणे (पंढरी गायकवाड) – महाराष्ट्र मध्ये कोरोनाचा सावट असल्यामुळे कित्येक पोलिस कर्मचारी व अधिकारी यात बाधित व शहीद झालेले आहेत त्यामध्ये 55 वर्षावरील पोलिस कर्मचाऱ्यांवर घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळामुळे कोरोना संकटात वाढतोय पोलिसांवरचा ताण वाढत आहे.
या मनुष्यबळाची पुर्तता करण्यासाठी व पोलिस दलावर पडणारा ताण कमी व्हावा या दृष्टिकोनातून कायद्याच्या चौकटीत राहून नियमाच्या आधारे पोलीस पाल्य ते अनुकंपा सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेतलेल्या व 2018 मध्ये प्रतीक्षा यादी मध्ये असलेल्या युवकांचा विचार केला तर हा ताण कमी होण्यास मदत होईल. यांच्यावर तात्काळ मंत्रिमंडळाची बैठक बोलावून जनतेच्या सेवेसाठी या सर्व युवकांचा देशसेवेसाठी वापर करावा. यामुळे पोलिस खात्यात संख्याबळ वाढेल, ताण कमी होईल, तरी या गोष्टीचा विचार करुन, तात्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा, ही विनंती महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल दूबाले व संपर्क प्रमुख पंढरी गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिलजी देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here