महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन चीनचा निषेध

पालघर(प्रमोद मिश्रा) – चीन कडून भारतीय जवानांवर जी हिंसक घटना झाली त्यात आपले २० जवान शहीद झाले त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.तसेच चिनी वस्तूचा आणि जीन पिंग यांचा फोटो पेटविण्यात आला.चिनी बनावटीचे सामान ही पेटविण्यात आल्या .चीनने केलेल्या ह्या कृत्याचा निषेध करण्यात आला.
महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन(महाराष्ट्र राज्य) मा.श्री.रवि वैद्य साहेब (संस्थापक अध्यक्ष) मा.श्री.सिद्धार्थ जाधव साहेब (प्रदेशाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य) आणि मा.श्री.धीरज पारसेकर साहेब (निवड समिती अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य) ह्याच्या आदेशानुसार आम्ही महाराष्ट्र पोलीस बॉइज असोसिएशन( पालघर जिल्हा) टीम सामाजिक कार्य करीत आहे. आज आपल्या महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन(पालघर) आणि अस्तित्व प्रतिष्ठान संस्थेकडून नालासोपारा पूर्व अगरवाल नगरी सर्कल येथे चिनी वस्तूचा आणि जीन पिंग यांचा फोटो पेटविण्यात आला.चिनी बनावटीचे सामान ही पेटविण्यात आल्या .चीनने केलेल्या ह्या कृत्याचा निषेध करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे दिपक मनोहर गोसावी (पालघर जिल्हा अध्यक्ष)/ निशा फाटक (पालघर जिल्हा महिला अध्यक्षा) भावना रांभिया (समाजसेविका) अनिल गुप्ता जी,अनिल पांडे जी,निखिल सोनी जी , रीना सोनी आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here