पार्कसाईट पोलीस ठाणेकडुन मोटार सायकल चोरी करणारी टोळी गजाआड

मुंबई (हितेश मिस्त्री) – शहरात वाढते मोटार वाहन चोरीचे गुन्हयांवर आळा घालणेकामी पोलीस आयुक्त बृहमुंबई परमबीर सिंग व सह.पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था ) विनयकुमार चौये यांनी गुन्हेपरिषदे दरम्यान दिलेल्या सुचना व आदेशाप्रमाणे अप्पर पोलीस आयुक्त, लखमी गौतम, पुर्व प्रादेशिक विभाग, मुंबई यांनी मोटार वाहन चोरी करणारे गुन्हेगारांना जेरबंद करणेबाबत व आपआपले पोलीस ठाणेत मोटार वाहन चोरी प्रतिबंधक पथके तयार करणेबाबत आदेशित केले होते. त्याअनुशंगाने पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम, सहा.पोलीस आयुक्त, विलास कानडे, प्र. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली पार्कसाईट पोलीस ठाणे येथे पो.निरी.सावंत, सपोनि दुकळे, व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते.
दि. २१/०८/२०२० रोजी पो.निरी. सावंत यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, मोटार सायकल चोरी करणारे इसम नामे १) रुपेश नागनाथ कांबळे वय २२ वर्ष रूम नं. ०५, शांतीदुत सोसायटी, राहुलनगर, पार्कसाईट, विकोळी प मुंबई २) विकास विश्वास बनसोडे वय १८ वर्ष रा.ठी. शांतीदुत सोसायटी, बौध्दविहाराजवळ, राहुलनगर, पार्कसाईट विकोळी प मुंबई ३) सुजल दिनेश जाधव वय १७ वर्प रा.टी. पंचशील सोसायटी, संजयगांधी नगर, बौध्द विहाराजवळ, पार्कसाईट विकोळी प मुंबई हे मोटार सायकल चोरी करीत असुन ते अमृतनगर, घाटकोपर प मुंबई येथे येणार असलेबाबत खवर मिळाल्याने प्रभारी व पोनि. विक्रम बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली दि. २१/०८/२०२० रोजी पो.निरी.सावंत, सपोनि. दुकळे व पथक यांनी सापळा लावुन ताब्यात घेतले. व त्यांचे कडे मोटार सायकल चोरी बाबत कसुन तपास केला असता त्यांनी विकोळी, घाटकोपर, साकीनाका, पवई परिसरातुन मोटार सायकल चोरी केल्याची माहीती दिली. तपासादरम्यान त्यांचे कडुन खालीलप्रमाणे मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
१) बजाज पल्सर २२० मोटार सायकल कमांक MH 03 CZ9531 २) टि.व्हि.एस.ॲपाचे मोटार सायकल कमांक MH-03 CR 8004 ३) होंडा युनिकॉर्न मोटार सायकल कमांक MH-03 BF 1840 ४) होंडा डिओ मोटार सायकल क्रमांक MH-03 CA 6268 ५) होंडा युनिकॉर्न मोटार सायकल कमांक MH-03 BR 1730 ६) होंडा डिलक्स मोटार सायकल क्रमांक MH 03 AV 2331 ७) वजाज पल्सर २२०, इंजीन DKZCDE68464 चेसीज MD2A13EZ1DCE72168 ८) होंडा ग्रेजा इजिन क JF49EU3182585 चेसिस ME4JF499GJU048152 ९) बजाज पल्सर १५० इजिन क JCGBPD13418 चेसिस JCZZPCD1350 १०) यमाहा आर.एक्स. १०० इजिन क 1155021574 चेसिस H1121574 ११) होंडा सी.बी.युनिकॉर्न,चेसीज क.MEAKC09CEB8109 इंजीन KC09E6113313
वर नमुद वाहनांवावत पार्कसाईट, पंतनगर, साकीनाका, पवई पोलीस ठाणे येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच वर नमुद आरोपी इसम अ.क. ०१ व ०२ यांना पार्कसाईट पोलीस ठाणे गुरनं. २१९/२० क. ३७९,३४ भादवि.प्रमाणे नोंद गुन्हयाचे तपासात दिनांक २१/०८/२० रोजी अटक करण्यात आली असुन नमुद आरोपी हे दि. २५/०८/२०२० पावेतो पोलीस कोठडी रिमांड मध्ये आहे. तसेच इसम क्रमांक ०३ हा विधीसंघर्प ग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवुन तपास करण्यात आला व त्यानंतर त्याचे पालकाचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-७,मुलुंड प मुंबई, सहा.पोलीस आयुक्त विक्रोळी विभाग विक्रोळी, मुंबई, प्र.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पार्कसाईट पोलीस ठाणे, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली पार्कसाईट पोलीस ठाणे कडील पो.निरी. सावंत, सपोनि. दुकळे, पो.हवा. ३१९९९/ शिंदे, पो.हवा. ३१३४७/पवार, पो.ना.९७०२२१ / गुजर, पो.ना.९६०६०७/टिळेकर, पो.शि.०९०१०६६/ राठोड, पो. शि.०६१८९७/ठाकुर, पो.शि.०८०३५९/गायकवाड, पो.शि. ०८१२००/पेडेकर, पो.शि. ०९२१४/बोरसे, पो.शि. ०११०५३७/गोसावी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here