भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – जिल्ह्यातील इतर ठिकाणी कोरोनाने थैमान घातलं होते तेव्हा माझ्या कुऱ्हा नगरीमध्ये एकही रुग्ण नव्हता. एवढेच नाही तर बाकीचे बरेच स्थलांतरित लोक गावात येऊन स्थायिक झाले. तरी सुद्धा एकही रुग्ण डिटेक्ट झाला नाही पण आता दुर्दैवाने कुऱ्हा नगरीत रुग्ण आढळत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे तपासणी शिबीर.
आज जो त्रास लोकांना दिसत आहे, तोच या आधीही होता परंतु लोकं फॅमिली क्लिनिक डॉक्टरकडे उपचार घेऊन ठणठणीत झालेत एव्हढेत नाही तर काही घरातल्या घरात आयुर्वेदिक उपचार करून बरे झालेत. याचं मुख्य कारण तेव्हा कोणत्याही तपासण्या झाल्या नव्हत्या. मग प्रश्न असा पडतो की हा खरंच कोरोना आहे की कोरोनाच्या नावाखाली शासनाची लूट व जनतेची फसवणूक. आमचा तपासणी शिबिराला व शासनाच्या मेडिकल धोरणाला अजिबात विरोध नाही परंतु आज जे घडतंय त्या बद्दल प्रश्न चिन्ह निर्माण होतोय. रुग्ण डायरेक्ट पॉझिटिव्ह दाखविल्याने गावातील रुग्ण संख्येत वाढ होतेय, यामुळे गावात अत्यंत भीतीदायक वातावरण तयार होत आहे.. हे कुठंतरी थांबलं पाहिजे हीच कुऱ्हा ग्रामस्थांची इच्छा आहे.







