घरगुती गणेश विसर्जनासाठी जळगावात श्री गणेश मूर्ती संकलन केंद्र

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – होय जळगावकर !!! आम्ही स्वीकारणार आहोत घरगुती गणेश मुर्तींच्या विसर्जनाची जबाबदारी, हे ध्येयवाक्य घेऊन जळगाव जिल्हा पोलीस दल व जळगाव शहर महानगरपालिका प्रेरीत भंवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौकात श्री गणेश मुर्ती संकलन केंद्र सुरु करण्यात आले आहे.
अनंत चतुर्दशी, मंगळवार, 01 सप्टेंबर 2020, सकाळी 6 ते सायं 7 वाजेपर्यंत या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वीकारण्यात येणार आहे. तरी शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, यंदा कोरोनाच्या संकटामुळे मेहरूण तलाव (विसर्जन स्थळ) या ठिकाणी गर्दी होऊ नये या अनुषंगाने काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे श्री गणेश मूर्ती संकलन केद्र उभारण्यात आले आहे. आपले घरगुती गणपती व निर्माल्य या ठिकाणी आणून आम्हास सुपूर्द करावी. मंडळाचे स्वयंसेवक यांच्या मार्फत बाप्पाचे विधिवतपणे विसर्जन करण्यात येईल, असे आवाहन अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक, रामानंदनगर पोलीस स्टेशन, जळगाव यांनी केले आहे. अधिक माहिती साठी विराज कावडीया – 94222 22699, अमित जगताप – 81490 45648 यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here