धरणगाव (जिल्हाप्रतिनिधी योगेश पी. पाटील) – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या कोविड – शिक्षण शुल्कनीती अभियानांतर्गत आज धरणगांव येथे आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज चे प्राचार्य टी. एस. बिराजदार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात १. शासनाने सूचित केल्याप्रमाणे कोणत्याही शैक्षणिक संस्थेने शुल्कवाढ करू नये., २. शक्य असेल तेवढे शुल्क पालक आणि विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा करून शैक्षणिक संस्थांनी कमी करावे., ३, . निश्चित केलेले शुल्क टप्प्या टप्प्याने भरण्यासाठी आराखडा आखावा व त्यानुसार अंमलबजावणी करावी., ४. कोणत्याही परिस्थितीत पालक किंवा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सक्ती करू नये त्याचबरोबर केवळ शुल्क न भरल्याचे कारण दाखवत कोणत्याही विद्यार्थ्यांला कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित ठेवू नये, या मागण्यात करण्यात आल्या आहेत. निवेदन देतांना राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष शिवरत्न पवार , राष्ट्रवादी युवक शह र अध्यक्ष संभाजी कंखरे , राष्ट्रवादी विद्यार्थी शहर उपाध्यक्ष निलेश पाटील , राष्ट्रवादी विद्यार्थी शहर कार्याध्य्क्ष क्षितिज सोनवणे, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष सागर बाजपेयी,मेघराज पाटील आकाश पाटील , प्रफुल पवार, शुभम मराठे, प्रवीण मराठे,हर्षल फुलपगार, लोकेश जाला, हेमंत चौधरी यांच्या समवेत कार्यकर्ते उपस्थित होते.
Home उत्तर महाराष्ट्र धरणगाव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे आर्ट, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज प्राचार्यांना निवेदन







