सातारा येथे कोरानाचे थैमान सुरूच; उच्चांकी 669 बाधित

  • 12 जणांचा मृत्यू
  • दिवसभरात 332 जणांना डिस्चार्ज
  • साताऱयात जम्बो हॉस्पिटल तातडीने उभारा
  • हॉटस्पॉट कराडकडे लक्ष द्या
  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली मागणी
    सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – जिल्हय़ात कोरोनाचे थैमान सुरूच असून बाधितांचे रोज नवे उच्चांकी आकडे येत आहेत. शुक्रवारी रात्री 669 इतके पॉझिटिव्ह आल्याने जिल्हय़ाची चिंता वाढली आहे. त्यातच 12 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 332 नागरिकांना दहा दिवसांनंतर रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. जिल्हय़ाची वाढ चिंताजनक असून पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण 22 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. आजच्या 669 पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये 339 जण ऍन्टिजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हय़ाची स्थिती गंभीर होत असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हय़ाला भेट देऊन आढावा घेतला.
    जिल्हय़ाची स्थिती गंभीर-फडणवीस
    राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना सातारा येथे जिल्हा रूग्णालय व कराड येथील कृष्णा रूग्णालयात भेट देऊन पाहणी केली. जिल्हय़ाची कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे साताऱयात तातडीने जम्बो कोविड हॉस्पिटल उभारावे. कराड हे हॉटस्पॉट झाले आहे. त्यामुळे शासनाने कराडकडेही जास्त लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. जिल्हय़ाचा बाधितांची टक्केवारी 18.50 टक्के होती. ती गेल्या आठवडय़ात 22 टक्क्यांपर्यंत गेल्याने ती राज्यापेक्षा जास्त आहे. जिल्हय़ात चाचण्या वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
    12 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू
    जिल्हय़ात मृत्यूची मालिका सुरूच असून शुक्रवारी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. क्रांतीसिह नाना पाटील रुग्णालय सातारा येथे कोरोनाबाधित असलेल्या पाटण येथील 45 वर्षीय पुरुष, उडतारे (ता. वाई) येथील 87 वर्षीय पुरुष, उंब्रज (ता. कराड) येथील 62 वर्षीय महिला, हिरळी (ता. खंडाळा) येथील 60 वर्षीय पुरुष, तारळे (ता. पाटण) येथील 64 वर्षीय महिला, कृष्णानगर कराड येथील 56 वर्षीय पुरुष, संगमनगर सातारा येथील 62 वर्षीय महिला, जयसिंगनगर सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, मायणी येथे कलेढोण येथील 35 वर्षीय पुरुषाचा तर विविध खाजगी हॉस्पीटलमध्ये वारुंजी (ता. कराड) 66 वर्षीय महिला, बनवडी (ता. कराड) येथील 70 वर्षीय महिला, तामजाईनगर सातारा येथील 79 वर्षीय पुरुष अशा एकुण 12 नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचीही माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
    332 नागरिकांना दिला डिस्चार्ज
    जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 332 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. यात जावली तालुक्यातील 8, कराड तालुक्यातील 146, खंडाळा तालुक्यातील 7, खटाव तालुक्यातील 14, कोरेगाव तालुक्यातील 39, महाबळेश्वर तालुक्यातील 3, माण तालुक्यातील 13, पाटण तालुक्यातील 7, फलटण तालुक्यातील 26, सातारा तालुक्यातील 62, वाई तालुक्यातील 7 असे एकुण 332 नागरिकांचा समावेश आहे.
    जिल्हय़ाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी मंगळवार पेठेतील निवासस्थानी गणेशाचे दर्शन घेतले. मुंबईच्या ब्रीच कॅण्डीतून डिस्चार्ज घेतल्यानंतर काही दिवस त्यांनी विश्रांती घेतली. गणेशोत्सव, मोहरममध्ये जनतेने सोशल डिस्टन्स पाळून, मास्कचा वापर करून कोरोनावर मात करण्याचे आवाहन त्यांनी केले. याबरोबरच रूग्णालयात दाखल असताना सदिच्छा व्यक्त करणारांचे त्यांनी आभारही मानले आहेत.
    कराड तालुका तीन हजार रूग्णसंख्येकडे जास्त असताना शहरातही रूग्ण वाढत आहेत. कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे पती उमेश शिंदे यांच्यासह कुटुंबातील अन्य सात जण पॉझिटिव्ह आले आहेत. रोहिणी शिंदे यांनी नुकतीच कोरोनावर मात केली आहे.
    533 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
    शुक्रवारी विविध रूग्णालयातून 533 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 9, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 66, फलटण 11, कोरेगाव 40, वाई 18, खंडाळा 56, रायगाव 20, पानमळेवाडी 42, मायणी 50, महाबळेश्वर 19, पाटण 18, दहिवडी 52, ढेबेवाडी 28 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 104 असे एकूण 533 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
    गुरूवारी 575 अहवाल पॉझिटिव्ह
    जिह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 575 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. सातारा तालुक्यातील सातारा 13, मंगळवार पेठ 5, गुरुवार पेठ 2, शनिवार पेठ 1, अजिंक्य कॉलनी 1, सदरबझार 2, सिव्हील कॉलनी 1, गोलमारुती मंदिराजवळ 1, जिल्हा सहकारी क्वार्टर्स 1, आनंदनगर विसावा नाका 2, शाहूनगर 2, बसाप्पा पेठ 1, प्रतापसिंहनगर 1, झेडपी कॉलनी 1, रांगोळी कॉलनी 10, समता पार्क 4, संकल्प कॉलनी 4, पिलेश्वरीनगर करंजे 5, भोसलेनगर करंजे पेठ 6, राजसपुरा पेठ 1, शिवाजीनगर एमआयडिसी 1, प्रतापगंज पेठ 1, सिव्हील 1, यादोगोपाळ पेठ 1, तामजाईनगर 2, करंजे 3, नवीन एमआयडीसी 1, राधिका टॉकीजजवळ 1, शाहूपुरी 1, पांढरवाडी 1, संगमनगर 1, संभाजीनगर 1, राधाकृष्णनगर- संभाजीनगर 1, लिंब 1, फडतरवाडी 1, नेले 5, नुने 1, जोतिबाचीवाडी 2, जिहे 1, भाटघर 1, लिंब 4, वडूथ 1, अंगापूर 1, वर्ये 1, पानमळेवाडी 1, कोंडवे 2, बोरखळ 1, नागठाणे 1, विठ्ठल मंदिरमागे कृष्णानगर 1, खिंडवाडी 1, नंदगिरी खेड 2, कोडोली 1, खाले 2.
    कराड तालुक्यातील कराड 13, सोमवार पेठ 6, मंगळवार पेठ 6, बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 10, कृष्णा मेडीकल कॉलेज 4, विद्यानगर 5, शारदा हॉस्पीटल 7, श्री हॉस्पीटल 2, कोयना वसाहत 1, कार्वेनाका 5, शिवाजीनगर 1, सैदापूर 3, खराडे कॉलनी 9, वाखाण 6, शाहूचौक 1, मुजावर गल्ली 2, शास्त्राrनगर मलकापूर 1, बैलबझार 1, चावडी चौक 2, शाहूचौक 3, शांतीनगर 1, रुक्मिणीनगर 1, पोलीस लाईन कार्वे नाका 1, मलकापूर 21, धोंडेवाडी 1, वडगाव 2, आगाशिवनगर 3, खराडे 1, वाघेरी 1, गोळेश्वर 3, बेलवडी 1, पोतले 2, काले 2, खोडशी 2, बनवडी 5, पार्ले बनवडी 1, विरवडे 1, मसूर 2, माळवाडी 3, कोडोली 1, काले 1, घारेवाडी 1, किरपे 1, गोवारे 2, चिखली 1, वारुंजी 1, जखीणवाडी 1, ओंड 1, निसरे 2, बेलवडे खुर्द 1, बेलवडे बुद्रुक 1, कार्वे 8, ओगलेवाडी 2, बेलवडे हवेली 1, चोरे 3, तळबीड 1, उंब्रज 1, गोटे 1, दुशेरे 3, रेठरे बुद्रुक 2, कोडोली 1, हेळगाव 3, शेणोली 2, रेठरे खुर्द 3.
    पाटण तालुक्यातील पाटण 2, गुढे 1, म्हावशी 2, कुंभारगाव 1, नवारस्ता 1, संगवाड 1, मल्हारपेठ 1, तारळे 1, नवसरी 3, येराडवाडी 1, विहे 2. महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वरमधील गोडवली 1, वाई तालुक्यातील रविवार पेठ 1, गणपती आळी 5, भिमकुंड आळी 1, बापट बोळ 1, कलंगवाडी 1, मांढरदेवी 1, सिध्दनाथवाडी 1, स्पंदन हेल्थकेअर सोनगिरवाडी 5, भुईज 1, बावधन 1, ओझर्डे 1, खंडाळा तालुक्यातील गायकवाड मळा भाडे 1, अंदोरी 3, शेखमेरवाडी 2, शिरवळ 6, बिरोबावस्ती लोणंद 1, जांभूळमळा लोणंद 1, शिरवळमधील रामबाग सिटी 1, शिर्के कॉलनी 3, फुलमळा 1, शिवाजी कॉलनी 1, मिरजे 1, लोणंद 1, खंडाळा 4, अजनुज 3, केसुर्डी 1, पारगाव 2, बावडा 1, मोरवे 1, वर्धमान हाईटस लोणंद 2, निंबोडी 1, संघर्ष कॉलनी शिरवळ 1, खेड बु. 1. जावळी तालुक्यातील वेळे 1, कुसुंबी 2, आनेवाडी 10, फलटण तालुक्यातील फलटण 1, फलटण शहरातील मंगळवार पेठ 10, बुधवार पेठ 1, रविवार पेठ 1 कसबा पेठ 8, शिंदे मळा 1, शिवाजीनगर झोपडपट्टीतील 1, भडकमकरनगर 5, मेटकर वस्ती 1, बिरदेवनगर 1, ब्राम्हण गल्ली 1, काझी वस्ती रेल्वेस्टेशन 1, अमेय हॉस्पीटलमागे लक्ष्मीनगर 1, आसू 1, कोळकी 4, लक्ष्मीनगर 2, वाठारनिंबाळकर 10, कोऱहाळे 4, साखरवाडी 9, विडणी 1, गिरवी 1, बीबी 1, तरडगाव 1, रावडी बु. 1, जाधववाडी 1, तरडफ 1, ढवळ 1, कांबळेश्वर 1, बरड 2, सरडे 1, तामखाडा 9. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, अजिंक्य कॉलनी कोरेगाव 1, शिवाजी नगर 2, किन्हई 1, जळगाव 4, कुमठे 2, पिंपोडे 1, चौधरवाडी 4, कठापूर 6, रणदुल्लाबाद 1, रहिमतपूर 1, आझादपूर 1, सुलतानवाडी 1, खटाव तालुक्यातील खटाव 3, दातेवाडी 1, मायणी 2, पुसेसावळी 4, खातगुण 3, जांब 1, औंध 2, घोरपडे 1, येळीव 1, सिध्देश्वर कुरोली 1, जाखणगाव 1, माण तालुक्यातील म्हसवड 18, दहिवडी 3, राणंद 1, वाकी वरकुटे 1, इंजबाव 1, पळसवडे 1, देवापूर 1. इतर जिल्हा- वाळवा (सांगली) 1, इस्लामपूर (सांगली) 4, येळावी (तासगाव-सांगली) 1, कासेगाव (सांगली) 1, किल्लेमच्छींद्रगड (सांगली) 1, सासपडे (कडेगाव-सांगली)1, राख (पुरंदर-पुणे)1, कवठे (सांगली ) 2, कोल्हापूर पोलीस 6, मिरगाव (ठाणे) 1. इतर -4.
    जिल्हय़ात शुक्रवारी एकुण बाधित 669, एकुण मुक्त 332, एकुण बळी 12.
    जिल्हय़ात शुक्रवारपर्यंत घेतलेले एकुण नमुने 43441, एकुण बाधित 12887, एकुण मुक्त 6787, एकुण बळी 357, उपचारात 5743

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here