चोपड़ा (तालुका ग्रामीण प्रतिनिधी विनोद काबरा) – जिल्हापेठ पो.स्टे. गु.र.न. 81/ 2020 भा.द.वि. क. 307,353,224,120(ब) सह आर्म अॅक्ट क. 3/25 प्रमाणे दाखल गुन्ह्यात जळगाव कारागृहातुन 3 आरोपीतांनी कारागृह रक्षकास पिस्टलचा धाक दाखखुन त्यांचे एका साथीदाराचे मोटार सायकलवरून पळुन गेले होते. सदरचे आरोपी हे गुन्हा केल्यापासुन फरार होते. सदर आरोपीतांना अटक करणे कामी पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक जळगाव- श्रीमती भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव सचिन गोरे, सहा. पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांचे मार्गदर्शनाने पो.निरी. स्था.गु.शा. जळगाव यांनी त्यांचे कडील 5 पथके कार्यान्वयीत केले होते. सदर पथकाकरवी वरील 3 आरोपीतांना मदत करणारा आरोपी नामे जगदिश पुंडलीक पाटील उ.व. 19 रा. पिंपळकोठा ता. एरंडोल यास या पूर्वीच अटक करण्यात आलेली असून त्यास न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे. यातील इतर आरोपीतांना अटक करणे कामी स्था.गु. शा. कडील पथक त्यात पोह. रविंद्र पाटील , पोह.कमलाकर बागुल, पो.ना. रामकृष्ण पाटील, मुरलीधर बारी या पथकातील पोह. रविंद्र पाटील यांना मिळालेल्या माहिती वरून सदर पथकाने आरोपी सागर पाटील यास नवापुर जि. नंदुरबार येथुन ताब्यात घेतले. स.पो.निरी. स्वप्नील नाईक, सफौ. नारायणे पाटील, पो.ह. रामचंद्र बोरसे, पोना. मनोज दुसाने, पोना. महेश पाटील, पो.ना. चालक प्रविण हिवराळे असे सुरत येथे आरोपीतांचा शोध घेत होते तसेच पो.उप.निरी. लहारे, सफौ. विजय पाटील, दिनेश बडगुजर, विजयसिंग पाटील, शरद भालेराव, नंदु पाटील, दत्तात्रय बडगुजर, दिपक शिंदे, परेश महाजन, विजय शामराव पाटील, रमेश जाधव, कमलाकर बागुल, इद्रीस पठाण किरण धनगर, दिपक पाटील, जीतेद्र पाटील यांचे पथक नेमण्यात आलेले आहेत. आरोपी नामे सागर संजय पाटील 24 रा. पैलाड , अमळनेर हा नवापुर जि. नंदुरबार येथे असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने त्यास तात्काळ जावून ताब्यात घेतले व वरील गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो.निरी. बापु रोहोम हे करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी बुलंद पोलीस टाइम्स्शी बोलताना दिली.







