आज आढळले ५६६ कोरोना पॉझिटिव्ह : ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.२९) प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात ५६६ कोरोनाबाधित आढळले आहेत तर ६१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आज आढळलेल्या ५६६ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर-१४३, जळगाव ग्रामीण-४६, भुसावळ-३०, अमळनेर-८४, चोपडा-५१, पाचोरा-१०, भडगाव-३६, धरणगाव-२४, यावल-२३, एरंडोल-७, जामनेर-४१, रावेर-१६, पारोळा-२७, चाळीसगाव-१८, मुक्ताईनगर-१०, बोदवड-५ आणि बाहेरच्या जिल्ह्यांमधील ५ असे रूग्ण असा समावेश आहे.
दरम्यान, आजच्या वाढलेल्या ५६६ कोरोनाबाधितांमुळे एकूण संख्या २६ हजार ४३९ इतकी झाली असून, यातील १८ हजार ६९८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात आज ९ रूग्णांचा मृत्यू झाला असून आजवरच्या मृतांची संख्या ७९८ इतकी झालेली आहे. सद्यपरिस्थितीत जिल्ह्यातील ६९४३ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनातर्फे काढण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे.







