पुणे (प्रतिनिधी नारायण शेळके) – आज (दि.३०) बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष मेहुल आंबवडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सांगली जिल्हाध्यक्ष अक्षय तुपे यांच्या सोबत बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि. च्या सांगली जिल्हा संपर्कप्रमुखपदी पै.संजय शिवाजी हारूगडे यांची निवड करण्यात आली.
पै.संजय शिवाजी हारूगडे हे विविध पक्ष संघटनांमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत होतेच, पै संजय हारूगडे हे आध्यात्मिक काम करत असूनन युवकांचे तडफदार नेतृत्व आहे मानव सेवा हीच खरी समाज सेवा हा संदेश लोकांना देणारे खंबीर दातृत्वही त्यांच्या अंगी आहे. त्यांनी कोरोना संकटकाळी लोकांना अन्न धान्य वाटप केले आपल्या देशात कोरोना संकट आसताना आरोग्याच्या दृष्टीने चांगली माहिती देत होते. समाजसेवक पलूस तालुक्यात अनेक काम शैक्षणिक सामाजिक कामे तसेच गोरगरीब जनतेसाठी सैदव २४ तास समाजासाठी सेवेसाठी दिवस-रात्र लोकांची सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा करण्याची वृत्ती पाहून बहुजन परिवर्तन पार्टीच्या सांगली जिल्हा संपर्कप्रमुखपदी पै.संजय शिवाजी हारूगडे यांची नेमणूक करण्यात आली







