जळगाव (संपादक सुनिल पाटील) – संपूर्ण देशात कोरोना या महामारीने थैमान घातले असल्याने, बऱ्याच दिवसांपासून
लॉकडाऊन काळात जळगाव शहर व ग्रामीण परिसरातील धार्मिक स्थळे बंद आहे. ही धार्मिक स्थळे सुरु करण्यात यावी यासाठी जळगाव काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मराठीत एक म्हण आहे ‘आला पोळा आणि सण झाले गोळा’ या म्हणीनुसार आता सर्व समाजाच्या सणांना सुरुवात झाली असून, या दिवसांमध्ये नागरिक कुठल्या ना कुठल्या धार्मिक स्थळांचे दर्शन घेऊन मानलेले नवस फेडत असतात. हा सर्व समाजाच्या श्रध्देचा विषय असून, आता सर्व नागरिक जागृत झालेले आहे. सोशल डिस्टसिंग व मास्क वापरण्यासह सर्व काळजी आता घेतली जात आहे. तरी सर्व धर्मींयांच्या धार्मिक श्रध्देचा विचार करता ही धार्मिक स्थळे उघडण्यात यावीत. निवेदनावर जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी, प्रमोद घगे, भाऊसाहेब सोनवणे, भिकन सोनवणे, मुकेश कोळी, धनराज जाधव, समाधान पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव जळगावातील धार्मिक स्थळे सुरु करण्यासाठी जळगाव काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन







