पुणे (प्रतिनिधी नारायण शेळके) – शनिवार (दि.२९) बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिलाv बचाव समिती रजि संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सचिव राजेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि ठाणे जिल्हा युवाअध्यक्ष पदी नितीन प्रभू वायदिंडे (शिक्षण MA)यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नितीन प्रभू वायदिंडे हे ठाणे शहरात अनेक वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, गोरगरीब जनतेसाठी सदैव दिवस-रात्र सेवाभावी वृत्तीने काम करत असतात. नितीन साहेब देशात कोरोणाचे संकट उभे असूनसुध्दा आपला जीव धोक्यात घालून लोकांना सेवा उपलब्ध करून दिली. आरोग्य तपासणी व कोरोनापासून बचाव कसा करावा याची माहिती ते सर्वसामान्यांना देतात त्यांच्या या कार्याचा आवाका लक्षात घेता नितीन प्रभू वायदिंडे यांची ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष नेमणूक करण्यात आली आहे.







