पुणे (प्रतिनिधी पंढरी गायकवाड) – विनायकराव भोंगाळे कृषी जल व पर्यावरण संवर्धन फाउंडेशन व गायत्री सखी मंच
यांच्या विद्यमाने आज रविवार दिनांक 30 /8 /2020 रोजी “फायरिंग रेंज ,दिघी मॅक्झिन चौक“ येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या वसुंधरे प्रति आपली असणारी बांधिलकी आपण जपणे गरजेचे आहे. सकाळी 6:30 ते 10:00 च्या दरम्यान आळंदी -दिघी रोड, मॅक्झिन चौक येथे हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
त्यावेळी आ.महेशदादा लांडगे आमदार भोसरी विधानसभा , उमाताई खापरे (प्रदेशाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा), शैलाताई मोळक(कोषाध्यक्ष भाजपा प्रदेश महिला आघाडी ), उज्वलाताई गावडे(पिंपरी चिंचवड भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष), कविता भोंगाळे, कुंदाताई संजय भिसे (अध्यक्षा,उन्नति सोशल फाउंडेशन), निकिता गोसावी, सतीश कुमार शर्मा (ले.कर्नल) व इतर मान्यवर उपस्थित होते.








