चोपडा (संदीप ओली) – आज दिनांक ३०/८/२०२०रोजी चोपडा विश्राम गृह येथे आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या हस्ते गणेश पाटील मालखेडा सहसचिव राष्ट्रीय काँग्रेस चोपडा यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी मुन्ना पाटील उपजिल्हा प्रमुख शिवसेना, अॅड एस डी सोनवणे, ऐ के गंभीर, भरतभाऊ बावीसकर पं स सदस्य, सुकलाल कोळी तालुका संघटक, प्रविण भाऊ साळुंखे, पंडीत कोळी, अनुप जैन उपस्थित होते. गणेश पाटील हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षांचे जिल्हा अध्यक्ष अॅड. भैय्यासाहेब संदिप सुरेश पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.गणेश पाटील यांनी आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा आण्णासाहेब चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या कामाच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला.
Home राज्य उत्तर महाराष्ट्र मालखेड्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे सहसचिव गणेश पाटील यांनी बांधले शिवबंधन







