श्यामलाल वाघ यांचे अपघाती निधन

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी. पाटील) – येथील सेवानिवृत्त एस टी वाहन कंडक्टर शामलाल शिवलाल वाघ यांचे अपघाती दुःख निधन याबाबत सविस्तर वृत्त असकी धरणगाव येथील सेवानिवृत्त एस टी कंडक्टर हे रोज चोपडा रस्त्यावर पायी फिरण्यासाठी जात असत दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 ते 7:30 सुमारास आपल्या दोघा मित्रा सोबत फिरायला गेले असता धरणगाव होऊन अमळनेर जाणाऱ्या एका अज्ञात दुचाकी स्वाराने शामलाल वाघ यांना जोरात धडक दिल्याने वाघ यांचे डोक्याला व छातीला जबर मार लागला धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले असता त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला.
दुचाकी स्वार हा अमळनेर येथील रहिवासी असल्याचे वृत्त हाती आले असून ते केबल दुरुस्तीचे काम करीत असल्याचे कळले. श्यामलाल वाघ यांच्या पश्चात त्यांना एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.सदर वृत्त कळताच शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर धरणगाव न.पा.चे नगरसेवक भानुदास आप्पा विसावे,वासुदेव चौधरी,भागवत आप्पा चौधरी,ललित येवले व गावातील शिवसेना व सर्व पक्षाचे कार्यकर्ते यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट दिली असता व त्यांनी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टरांशी चर्चा केली असता. श्यामलाल वाघ यांचे दुःख निधन झाले असल्याचे सांगितले सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती दिनांक 31 रोजी सकाळी 9 वाजता अंत्यविधी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here