धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी. पाटील) – ज्ञानवंतांची आणि यशवंतांची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकमहोत्सवी पी. आर. हायस्कूलचे तडफदार संचालक तथा धरणगाव नगरीचे माजी युवा नगराध्यक्ष आदरणीय अजय भाऊ पगारीया यांचा आज जन्मदिवस..!!
महाराष्ट्रातील एकमेव अशी संस्था असावी की ज्या संस्थेत संस्थाचालक गेल्या अनेक वर्षांपासून एकसंघ ,एकमताने काम करीत आहेत .ही संस्था नव्हे तर एक कुटुंब आहे या संस्थेतील प्रतेक घटकाला कुटूंबातील सदस्य म्हणून वागणूक देणारे अजय भाऊ आणि संस्थाचालक आहेतच
अंजनी परिसराचे भाग्यविधाते स्व.अमोलकचंद काकाजी यांच्या परिवाराला नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्वाचा वारसा परंपरेने लाभला आहे तोच वारसा अजयभाऊ पुढे नेत आहेत.
अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ,विचारांशी तडजोड नाही ,विचार हा नेहमी समाज हिताचा असतो आणि वेळेच्या बाबत देखील कधी तडजोड चालत नाही. आर्थिक व्यवहार तर भाऊंकडूनच शिकावा ,एकदम चोख , दररोज चा ताळमेळ जमलाच पाहिजे. राजकारणात देखील तारुण्यात नगराध्यक्ष पदाचा मान मिळाला मात्र सध्याचे गढूळ राजकारण आणि वैचारिक निष्ठा नसल्याने भाऊ राजकारणा पासून कायमचे अलिप्त झालेत आजही अनेकांना भाऊंच्या कार्यशैलीची आठवण होते ,राजकारणात त्यांचा विचार घेतला जातो.
अनेकदा घरात सुद्धा वेळे बाबत त्यांचे म्हणणे पटत नाही पण भाऊ वेळेचे एकदम पक्के आहेत आणि नियोजनात हातखंडा आहे.सुख, दुःखात डगमगून जाऊ नये घरातील जबाबदार व्यक्तीने कधीही खचून जाऊ नये, ही शिकवण भाऊंची आहे.सौभाग्यवती मंगला भाभी यांनी देखील भाऊंच्या पाठीमागे खंबीर साथ आहे दोघंही धार्मिक कार्यात आणि गुरू महाराज यांचा सेवेत अग्रेसर असतात स्व.काकाजींचा हा सेवेचा वारसा हे कुटुंब पुढे नेत आहे. पगारीया परिवार अंजनी परिसरात आदर्श परिवार आहे. आजही जुने जाणते लोक पगारीया परिवाराचे नाव आदराने घेतात.त्यांच्या कार्यकर्तृत्वाने हा परिवार सुखी आणि समाधानी आहेच भाऊंची मुले वैशाली,विजय हे देखील स्वतःच्या पायावर उभे राहून छान प्रगती करीत आहेत. अत्यंत समाधानी,उत्साही आणि कर्तृत्ववान अशा भाऊंना वाढदिवसाच्या निमित्ताने अनंत हार्दिक शुभेच्छा…!!
परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य देवो हीच प्रार्थना…!!







