जळगाव (प्रतिनिधी) – कोचिंग क्लासेस असोशिएशनचे अध्यक्ष प्रा.पांडूरंग मांडकीकर यांच्या सहमतीने व प्रा.आप्पासाहेब मस्के पाटिल यांच्या सुचनेनुसार ‘कोचिंग क्लासेस असोशिएशन’ची जळगाव जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अध्यक्षपदी प्रा.पंकज नाले तर सचिवपदी प्रा.जनार्दन मगरे यांची निवड करण्यात आली आहे.
जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष: श्री. पंकज नाले (पी सी एम बी क्लासेस, जळगांव), उपाध्यक्ष: किरण बारी (विवेकानंद कोचिंग क्लासेस,शिरसोली), उपाध्यक्ष सौ. प्रतिभा सुखदेव पाटील (दीप कोचिंग क्लासेस, पिंप्राळा, जळगाव), सचिव जनार्दन मगरे (यश स्तंभ कोचिंग क्लासेस, जळगाव), सह सचिव वासुदेव पाटील (दिशा स्पर्धा परीक्षा, जळगाव), कोषाध्यक्ष सौ. सुवर्णा जनार्दन मगरे मॅडम, (एस वाय अबॅकस कोचिंग क्लासेस, जळगाव), सहकोषाध्यक्ष सौ. सुरेखा सचिन सैंदाने, (समर्थ कोचिंग क्लासेस, जळगाव), संघटक आशिष पाटील (वेदांत कोचिंग क्लासेस, बिबा नगर, जळगाव), सहसंघटक प्रशांत महाजन (मॅथ क्लासेस, जळगाव), प्रवक्ता सौ. पाटील मॅडम (रूद्रा कोचिंग चिकित्सा, मोहाडी रोड, जळगाव), कार्यकारिणी सदस्य – शिरीष पाटील (गुरुकृपा कोचिंग क्लासेस, जळगाव), सी, आर,पाटील (सुबोध कोचिंग क्लासेस जळगाव), योगिता अमृतकर (संस्कृत कोचिंग क्लासेस जळगाव), श्री. निकम (इंग्लिश स्पिकीन क्लासेस, चाळीसगाव), हर्षाली पाटील (स्वामिरज कोचिंग क्लासेस) आहे.
प्रभारी प्रा.अप्पासाहेब म्हस्के पाटील राज्य-कोषाध्यक्ष, कोचिंग क्लासेस असोशिएशन CCAमहाराष्ट्र राज्य प्रभारी उत्तर महाराष्ट्र, राज्य समन्वयक प्रा अजबराव मनवर, कोचिंग क्लासेस असोशिएशन CCAमहाराष्ट्र राज्य, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शाम कापुरे, राज्य कार्यकारिणी सदस्य कोचिंग क्लासेस असोशिएशन CCAमहाराष्ट्र राज्य यांनी जळगाव जिल्हा कार्यकारिणीमधील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे मनःपुर्वक अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्याची माहिती कोचिंग क्लासेस असोशिएशन CCAमहाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रा.ज्ञानेश्वर ढाकणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.







