होय जळगावकर !!! आम्ही स्वीकारणार आहोत, घरगुती गणेश मुर्तींच्या विसर्जनाची जबाबदारी

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जळगाव जिल्हा पोलीस दल व जळगाव शहर महानगरपालिका प्रेरीत भंवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित श्री गणेश मुर्ती संकलन केंद्र काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे गणेश विसर्जनासाठी मूर्ती अनंत चतुर्दशी, मंगळवार, 01 सप्टेंबर 2020 सकाळी 6 ते सायं 7 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.
यंदा कोरोनाच्या संकटामुळे मेहरूण तलाव (विसर्जन स्थळ) या ठिकाणी गर्दी होऊ नये या अनुषंगाने काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे श्री गणेश मूर्ती संकलन केद्र उभारण्यात आले आहे. आपले घरगुती गणपती व निर्माल्य या ठिकाणी आणून आम्हास सुपूर्द करावी. मंडळाचे स्वयंसेवक यांच्या मार्फत बाप्पाचे विधिवतपणे विसर्जन करण्यात येईल, असे रामानंदनगर पोलीस स्टेशन जळगावचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे.
गणेश मूर्ती संकलनाबाबत अधिक माहितीसाठी विराज कावडीया – 94222 22699, अमित जगताप – 81490 45648 यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here