मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्री) – सोमवार दि. ३१ ऑगस्ट, २०२० रोजी अंधेरी (पश्चिम),मुंबई येथीलडी.एन.नगर पोलीस
ठाण्यात धडक कामगार युनियन उत्तर पश्चिम जिल्ह्या कडून पोलीस बंधू भगिनींसाठी फेस शिल्ड फेस मास्क तसेच सॅनिटायजर यांचे वाटप करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री गमने यांच्या दालनात विख्यात कामगार नेते अभिजित राणे (संस्थापक महासचिव – धडक कामगार युनियन) यांच्या हस्ते उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष श्री मनोज तिवारी यांच्या माध्यमातून श्री गमने वरिष्ठ पोलीस निरीक्षक याना वरील साहित्य वितरण करण्यासाठी सुपूर्द करण्यात आले.
सदर वेळी आशिष तिवारी, सौ स्वाती गमरे (अंधेरी पश्चिम विधानसभा अध्यक्ष -अभिजित राणे फौंडेशन) तसेच सौ रेश्मा सोलंकी सौ सबिना सिद्दीकी तसेच धडक माथाडी जनरल कामगार युनियन महाराष्ट्र संपर्क प्रमुख विनय डोळस, सचिव विन्स्टन परेरा उपस्थित होते.








