ठाणे (प्रतिनिधी आमित जाधव) – तात्काळ निर्णय घेऊन कोरोना कालावधीत वाहतूकबंदीमुळे अनुपस्थित असलेल्या शिक्षकांचे पगार कपात करण्यात येऊ नयेत असे आदेश राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले आहेत.
शिक्षकांच्या पगार कपात न करण्याचा निर्णय घेण्यास उशीर करणाऱ्या अधिकारी प्रमोद गायकर यांनी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी फोन करून चांगले झापले. प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेचे राज्य अध्यक्ष ॲड. अजय तापकीर यांच्या नेतृत्व खाली सर्वशिक्षा अभियानातील शिक्षकांचे शिष्टमंडळाने माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या समोर शिक्षकांच्या समस्या या वेळी मांडल्या








