जळगाव (संपादक सुनिल पाटील) – महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल, कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांचा उद्या (दि. २) वाढदिवस आहे. यानिमित्ताने नाथ फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांमध्ये कोरोणा संसर्ग रोखण्यासाठी कोविड सेन्टर जळगाव शासकीय महाविद्यालय या ठिकाणी उद्या दिनाक २/ ९ / २०२० बुधवार रोजी सकाळी गुलाबराव देवकर इजिनियर काँजेल या ठिकाणी आमदार सुरेश (राजुमामा ) भोळे , डॉ. गुरुमुख जगवाणी सकाळी ९ : ०० वा यांच्या हस्ते वाटप जळगाव मनपा कोविड सेन्टर , शासकीय महाविद्यालय जळगाव या ठिकाणी सौ भारतीताई सोनवणे (महापौर ..मनपा जळगाव ) कैलासआप्पा सोनवणे (नगरसेवक मनपा जळगाव ) यांच्या सकाळी ११ : ३० हस्ते वाटप , ईकरा काँलेज कोविड सेन्टर येथे डॉ . अश्विनभाऊ सोनवणे (उपमहापौर .. मनपा जळगाव )वेळ सकाळी ११ : ०० वा यांच्या हस्ते श्वास घेण्यासाठी वाफेचे १०० मशीन देण्यात येणार आहे. त्यानंतर सौ सुचिताताई हाडा (सभापती ..मनपा जळगाव ) यांच्या हस्ते सकाळी १० : ०० वा ईच्छादेवी चौक येथे विधवा , गरीब , निराधार , फुटपाथवर , काडी कचरा वेचणाऱ्या २०० महिलांना साड्या वाटप करण्यात येणार असून, नाथ फाऊंडेशनच्या पदाधिकारी सदस्य यांच्या हस्ते तंट्या भिल सोसायटी , तांबापूर , रामेश्वर काँलनी या ठिकाणी गंहु , तांदूळाचे ३०० किट वाटप यानंतर याच मान्यवरांच्या हस्ते मँक्स १००० , सँनिटायझर बाँटल १००० सामान्य नागरिकांना वाटप केल्यानंतर पन्नालालजी लाडवंजारी (संस्था अघ्यक्ष ) श्रीराम माध्यमिक विघालयातील गरीब व होतकरू अंकरा मुले / मुली एक वर्षासाटी दत्तक व त्याचा मोफत शैक्षणिक खर्च (ज्यांना आई , वडील नाही ते मुले / मुली ) करण्यात येणार आहे.
नाथ फाऊंडेशनचे पदाधिकारी सदस्य श्रीराम माध्यमिक विघालयातील आँनलाईन ५ वी ते १० वी मुला / मुलीसाठी निबंध , चित्रकला स्पर्धा घेण्यात येऊन या स्पर्धेत पहिला , दुसरा , तिसरा क्रमांक येणाऱ्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. आमदार सुरेश (राजुमामा ) भोळे , डॉ गुरुमुख जगवाणी यांच्या हस्ते कोरोनाच्या काळात सतत मदत व रोग्यांना जीवदान देणारे डॉक्टर , पोलिस , प्रशासन यांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
याप्रमाणें नाथ फाऊंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमांना उपस्थिती देण्याचे आवाहन नाथ फाऊंडेशनचे अशोक लाडवंजारी , दिपक फालक , सुनिल खडके , सुनिल माळी , चंदन महाजन , प्रविण कुलकर्णी , दिलीप माहेश्वरी , विनोद मराठे , अमित चौधरी , भगवान सोनवणे , प्रकाश पडीत , सौ शरीफा तडवी यांनी केले आहे.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव नाथ फाऊंडेशनतर्फे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन







