जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांनी पर्यावरणपूरक पध्दतीने आपल्या घरच्या गणरायाचे विसर्जन केले आहे. घरी बनवलेल्या पाण्याच्या हौदात त्यांनी गणपती बाप्पाचे विसर्जन केले व गणपती बाप्पांची आठवण म्हणून एक कडुलिंबाचे झाड देखील लावले.
यावर्षी कोरोना मुळे प्रशासनाने यावर्षी मिरवणुका आणि सार्वजनिक ठिकाणी गणेश विसर्जनावर निर्बंध घालून कृत्रिम तलावात किंवा मूर्तिदान करून विसर्जन करण्यास सांगितले आहे. याबाबी लक्षात घेऊन जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांनी पर्यावरणपूरक पध्दतीने घरच्या घरी गणेश विसर्जन करून व झाड लावून समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. तसेच या दहा दिवसांत गणरायाला जे हार फुले वाहून जे निर्माल्य जमा झाले होते ते निर्माल्य झाडाला खत म्हणून टाकले माती पासून बनवलेल्या गणपती बापाची स्थापना केली असल्या कारणाने विसर्जन केलेल्या बापाची मूर्ती पाण्यात विरघळल्या नंतर ते पाणी त्या कडुलिंबाच्या झाडाला टाकण्यात येणार आहे. यातून एक पर्यावरण रक्षणाचा संदेश रोहिणी खडसे खेवलकर यांनी दिला आहे. याप्रसंगी रोहिणी खडसे खेवलकर, डॉ प्रांजल खेवलकर, माजी सरपंच पुष्पाताई खेवलकर, डॉ मनिष खेवलकर, प्राजक्त खेवलकर ,पांडुरंग नाफडे उपस्थित होते







