जळगाव जिल्ह्यातील २० हजार २६८ रुग्णांनी केली कोरोनावर मात

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आज ५४१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २८ हजार १३२ झाली आहे. मात्र जिल्हावासियांच्यादृष्टीने आनंदाची गोष्ट म्हणजे जिल्ह्यातील २० हजार २६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
आज आढळलेल्या ५४१ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहरामधील कोरोनाचा संसर्गाचा आकडा आजही सर्वाधिक आहे. ५४१ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर ११७, जळगाव ग्रामीण २९, भुसावळ-३५, अमळनेर-९०, चोपडा-५७, पाचोरा-८, भडगाव-११, धरणगाव-३३, यावल-१०, एरंडोल-३१, जामनेर-५७, रावेर-५, पारोळा-२४, चाळीसगाव-६, मुक्ताईनगर-१२, बोदवड-११ व इतर जिल्ह्यातील ५ असा समावेश आहे. सद्यपरिस्थितीत ७ हजार ४२ रुग्णांवर उपचार सुरु असून, एकूण मृतांची संख्या ८२२ इतकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here