पुणे चिंचवड (विशेष प्रतिनिधी) – अनंत चतुर्दशीनिमित्त विघ्नहर्त्याला निरोप देताना बरेचसे नागरिक पर्यावरणाचा
विचार करत नाही. त्यामुळे गणेश मूर्ती नदीत, तळ्यात सोडतात, त्यामुळे जलप्रदुषण होते. मात्र या गोष्टीचे भान बाळगणारे जागरुक नागरिक मात्र याबाबत काळजी घेताना दिसतात. येथील आनंदघन वृध्दाश्रमानेदेखील नावीन्यपूर्ण पध्दतीने गणेश विसर्जन करुन समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आनंदघन वृध्दाश्रमाच्या संस्थापक अध्यक्षा सौ.निशाताई मधुकर रसाळ यांच्या संकल्पनेतून गणेशमूर्तीचे एका मोठ्या पाण्याच्या भांड्यात विसर्जन करुन, नदी व तळ्याचे पाणी प्रदुषित होणार नाही. याची काळजी घेण्यासोबत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे. महाराष्ट्रातील जनतेनेदेखील श्री गणेश दैवताचा आदर सन्मान राहिल असा हा नवा उपक्रम करावा, असे आवाहन आनंदघन वृध्दाश्रमाच्या अध्यक्षा निशाताई यांनी केले आहे.







