चाळीसगाव येथे गांजा विक्री व्यवसायाचा पर्दाफाश

चाळीसगाव – शहरात बुधवारी गांजा व रोकड जप्त झाल्याने खळबळ उडालेली असताना गांजा प्रकरणातील संशयित हा दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. गांजा विक्रीत सलीम हा ‘छोटा मासा’ आहे. त्याच्या पाठीमागे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असावेत, तसेच काही राजकिय मंडळी सुद्धा असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
चाळीसगाव येथील घाट रोड परिसरातील झोपडपट्टीत सलीम अली अशरफ आली यांच्या घरातून ओला व सुका दोन किलो वजनाच्या गांजासह 16 लाख 55 हजार रुपयांची रोकड पोलिसांनी छापा टाकून जप्त केली.सलीम हा दोन्ही पायांनी दिव्यांग असल्यामुळे नक्कीच त्याच्या मागे गांजा तस्करी व विक्रीचे मोठे रॅकेट असावे, असा अंदाज बांधला जात आहे. सन 2004 मध्ये तालुक्यातील चिंचगव्हाण येथे झालेल्या मोठ्या अपघातात सलीमचे दोन्ही पाय कंबरापासून निकामी झालेत. अपघातापूर्वी तो भंगार विक्रीचा व्यवसाय करीत होता. परंतू अपघातात दोन्ही पाय निकामी झाल्यामुळे, तो हळुहळु गांजा विक्रीच्या धंद्यात उतरला.
तब्बल 15 वर्षांपासून तो गांजा विक्रीत असल्यामुळे घाटरोड परिसरात तो प्रसिद्ध होता. गांजा विक्रीचा धंद्यातून 15 वर्षात त्याच्याकडे रगड पैसा जमा झाला. दिवसभर गांजा विक्री बरोबर तो गांजाची नशा देखील करीत असे. पोलीस त्याच्या घरी कारवाईसाठी गेले, त्यावेळेस तो नशेत होता, पोलिसांच्या कारवाईला विरोध करत, गादीच्या खाली उतरण्यास त्याने प्रचंड विरोध केला.
सलीमच्या घरातून पोलिसांनी 2 लाख 72 हजार रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा, तसेच 500, 100, 50, 10 रुपयांच्या इतर रक्कमेच्या नोटा आढळुन आल्यात, तब्बल 16 लाख 55 हजार रुपये जप्त केल्याची माहिती पडल्यावर घाटरोड परिसरात धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here