पुण्यात मंगळवारी आढळले कोरोनाचे 1,933 नवे रुग्ण तर 73 मृत्यू

पुणे (प्रतिनिधी अजय पवार) – जिल्ह्यात आज कोरोनाचे 1 हजार 933 नवे रुग्ण आढळले. त्यामध्ये पुणे शहरातील 876 तर पिंपरी चिंचवडमधील 598 रुग्णांचा समावेश आहे. तसेच पुणे शहर 37 आणि पिंपरी चिंचवडमधील 13 जणांसह एकूण 73 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दरम्यान आज दिवसभरात 2972 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
पुणे शहरात सोमवारी ‘आरटीपीसीआर’ व ‘अँटिजेन’ चाचणीसाठी 2,847 संशयितांचे नमुने घेण्यात आले. तर आतापर्यंत 4 लाख 51 हजार 53 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. आतापर्यंत शहरात एकूण 95,373 पॉझिटिव्ह आढळले आहेत. याचबरोबर आज दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या 1,384 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला; तर आतापर्यंत 78,070 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या शहरातील विविध रुग्णालयांत 14,999 सक्रिय रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. त्यापैकी 3,106 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. सध्या 884 रुग्ण गंभीर असून, त्यापैकी 527 अत्यवस्थ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
उपचारादरम्यान सोमवारी पुणे शहरात 37 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्यापैकी 23 पुरुष तर 14 महिला आहेत. या मृतांचे वय 37 ते 86 च्या दरम्यान होते. एनडीए, येरवडा, उत्तमनगर, धानोरी, पर्वती, गणेशखिंड रोड, शिवणे, शनिवार पेठ, एरवंडणे, गणेश पेठ, वारजेगाव, कोथरूड, कात्रज, वडगाव बुद्रुक, औंध, कर्वेनगर, मॉडेल कॉलनी, हडपसर, बालाजीनगर, कोंढवा, कसबा पेठ, धायरी, कळस, बोपोडी, बुधवार पेठ, हांडेवाडी व बिबवेवाडी येथील रहिवाशी होते. त्यापैकी काहींना जोखमीचे आजार होते. आता शहरातील एकूण मृतांची संख्या 2,304 वर पोचली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे नवे 598 रुग्ण आढळून आले. बाधितांची एकूण संख्या 50 हजार 260 झाली असून, सक्रिय 5 हजार 456 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 3 हजार 215 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले, तर कोरोनातून बरे झालेल्या 1 हजार 31 रुग्णांना घरी सोडण्यात आले. बरे झालेल्यांची संख्या 36 हजार 757 झाली आहे. 373 जणांना क्‍वारंटाईन करण्यात आले. आज सोमवारी मोशी, चिंचवड, चिखली, थेरगाव, भोसरी, रहाटणी, रावेत, संभाजीनगर तसेच, खेड येथील रहिवाशी असलेल्या 13 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाने मरण पावलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 52 झाली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here