जळगाव जिल्ह्य़ात प्रथमच बी.ए.एम.सी.जे. पदवी अभ्यासक्रम

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जनसंवाद आणि पत्रकारिता क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी के.सी.ई.सोसायटीच्या मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात जिल्ह्य़ात प्रथमच बी.ए.एम.सी.जे. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश देणे सुरु आहे.
युजीसीनुसार पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रमांची पुर्नरचना व रोजगाराभिमुख व कौशल्यावर आधारित करण्यात आला आहे. वृत्तपत्र,इलेक्ट्रॉनिक मीडिया, जनसंपर्क, जाहिरात, न्यू मीडिया, आकाशवाणी,जनसंपर्क कार्यालये, कॉर्पोरेट उद्योग, वृत्तपत्रे, एफ.एम.रेडिओ, सोशल मीडिया,फिल्म मेकिंग आदि क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी उपलब्ध आहे. *बी.ए.एम.सी.जे. अभ्यासक्रमाला प्रवेश 12 वी उत्तीर्ण कोणत्याही विद्याशाखेचा विद्यार्थ्यास व बी.ए. एम.सी.जे. अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी विभागात नावनोंदणी सुरु आहे. सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणत्याही विद्याशाखा उत्तीर्ण या अभ्यासक्रमाला पात्र असेल. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी पत्रकारिता विभागप्रमुख प्रा. संदीप केदार, केतकी सोनार यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
संपर्कासाठी क्रमांक – 8600070099, 9156997175, 8830743168

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here