खोपोली व शीळफाटा येथे विसर्जनासाठी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांसाठी अल्पोपहार सेवा

पनवेल (प्रतिनिधी गणेश पाटील) – येथील सामाजिक कार्य क्षेत्रातील इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेली सहजसेवा फाऊंडेशन खोपोलीतर्फे दिनांक 01/09/2020 रोजी दीपक हॉटेल चौक,विरेश्वर मंदिर तलाव, खोपोली बाजारपेठ, रहाटवडे,वासरंग,मुळगाव, कुत्रीम विसर्जन तलाव मोगलवाडी,शीळफाटा पोलीस चौकी, हनुमान मंदिर विसर्जन घाट शीळफाटा याठिकाणी सहजसेवा फौंडेशन खोपोली व खिदमते खल्क,खोपोली यांनी संयुक्तरित्या पोलिसांसाठी अल्पोपहार सेवा राबविली. या उपक्रमात सौ.वर्षा मोरे,सौ.जयश्री कुलकर्णी,सौ. सुवर्णा मोरे,बी.निरंजन,आयुब खान, महेंद्र पालिवाल,केशरसिंघ राजपूत,नोमान खान,राजू उतेकर यांचे सहकार्य लाभले. सदर सेवा पुरविण्याची संधी दिल्याबद्दल खोपोली पोलीस स्टेशन यांचे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण डॉ.शेखर जांभळे यांनी आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here