दोंडाईचा (संतोष कोळी) – येथील वरवाडे भागातील माजी कॅबिनेट मंत्री आ.जयकुमार रावल आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुवरताई रावल यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलीतवस्ती निधीच्या माध्यमातून जवळपास ६२ लक्ष रुपये निधीतुन दोन मजली सामाजिक इमारत सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले .
याप्रसंगी दोंडाईचा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष रवींद्र उपाध्ये, भाजपा शहराध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती प्रवीण महाजन, आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे, प्रभागाचे नगरसेवक नबु पिंजारी, कृष्णा नगराळे, नगरसेवक संजय तावडे, भरतरी ठाकूर, खलील बागवान, नरेंद्र भाऊसाहेब गिरासे, मक्कन माणिक, इस्माईल पिंजारी, मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम, इंजि.शिवनंदन राजपूत, उपमुख्याधिकारी भामरे, रघुनाथ बैसाणे, कांतीलाल मोहिते, दीपक बाविस्कर, सचिन नगराळे, प्रवीण आगळे, भैय्या रामराजे, रवी अहिरे, सागर नगराळे, अजय बिऱ्हाडे, मुकेश नगराळे, प्रफुल नगराळे इ मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष रविंद्र उपाध्ये यांनी सादर केलेल्या कामामुळे परिसरातील गोरगरीब जनतेसाठी सार्वजनिक कार्यक्रम घेता येतील असे सांगितले , भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व विशद करणाराही वाचनालयाकडे जातील तेव्हा ख-या अर्थाने समाज सुधारना असे सांगितले होते म्हणुन सार्वजनिक सभागृहात वाचनालय सुरू करावे अशी मागणी केली. कृष्णा नगराळे यांनीआपलेमत मांडतांना आमदार जयकुमारभाऊ रावल व नगराध्यक्ष नयनकुवँरजी रावल यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा शहरातील सर्व प्रभागातील विविध विकासकामे होत आहेत त्या अनुषंगाने वरवाडे भागात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील भोगावती नदी काठावरील ८० लाखांचा संविधान पथ व चौपाटी, ६२ लाखाचे जयभीम सामाजिक सभागृह , ७५ लाखांचा दलित वस्तीतील गटारीवरील नाला, १ कोटी २० लाखाचा लेढुंर नाल्यावरील पुल इ कामे पुर्णत्वाकडे येत आहेत. ही कामे आम्ही करू शकलो कारण समाजाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरविता ३० ते ४० वर्षात कोणी कामे केली नाहीत ते आम्ही ३ ते ४ वर्षात करून दाखविली असे सांगितले. यावेळी रघुनाथ बैसाने, मक्कन माणीक यांनी देखील आपले विचार व्यक्त करुन आभार मानले.
Home Uncategorized दोंडाईचा येथील जयभीम सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन उपनगराध्यक्ष रवींद्र उपाध्ये यांच्या हस्ते संपन्न







