मुंबई (विशेष प्रतिनिधी) – साकीनाका येथील काजूपाडा विभागात श्री साईबाबा मंदिराचे भव्य भूमिपूजन सोहळा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते संपन्न झाला. उमा मंदिराचे पुजारी राजेश भट यांनी विधिवत पूजा अर्चना केली.
यावेळी ओम साईं शरण श्री लॉरेंस बाबा सेवा ट्रस्ट तर्फे आयोजित भूमिपूजन सोहळयात संयोजक लॉरेंस बाबा डिसोझा, बाबू बत्तेली, महेंद्र भानुशाली, मार्कडेय सिंह, अण्णा परब, सुभाष गायकवाड, किशोर ढमाळ, साईनाथ कटके, रत्नाकर शेट्टी, बंशीलाल सिंह, अजीज खान, राम साहू, संदीप सिंह, शिवश्री दत्ता शेळके, मंगला चव्हाण, देव गोविंद, आनंद आचरेकर, मिलिंद पुजारी, राजकुमार विश्वकर्मा, भैयालाल यादव, शिवदास विश्वकर्मा, मंगला यादव, छोटेलाल यादव, दिनेश मधुकुंटा, आनंद राणा, संदीप चव्हाण, हिरालाल पंजाबी, संदीप येजरे, श्याम थापा, भास्कर परब, अश्विन पवार, संदीप घरत, संजना घरत, दीपक बारिया, रुपेश परब, राजेश साळे आणि साई भक्त मोठया प्रमाणात उपस्थित होते.
गेल्या 40 वर्षांपासून मुंबई ते शिर्डी पायी पालखी काढली जात असून ब-यांच वर्षांपासून साई भक्तांची मागणी होती की एक साई बाबाचे मंदिर बांधण्यात यावे. साई भक्तांच्या मागणीनुसार श्री साई मंदिराचे काम सुरु करण्यात येत आहे. सर्व साई भक्तांचे स्वागत नेंसी लॉरेंस डिसोजा, मेलविन डिसोझा, अनिशा शिरकर, विवेक शिरकर, लुसी गोंन्साविल्स, जोसफ गोंन्साविल्स, आविना मिनीजीस, एल्ड्रिन डिसोजा, अँशली डिसोजा, कँरन डिसोजा, सँबस्तीन डिसोजा यांनी केले.







