पुण्यातील ढिम्म व्यवस्थेचा आणखी एक बळी; पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटेंचा कोरोनाने मृत्यू

पुणे (प्रतिनिधी अजय पवार) – महापालिकेचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्ता एकबोटे यांचे कोरोनाने निधन झाले आहे. मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास त्यांनी ससून रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.
दत्ता एकबाटे यांच्या मोठ्या मुलीचे आणि मुलाचे याआधीच कोरोनाने निधन झाले आहे. एकबोटे यांनी उपचारासाठी अनेक रुग्णालयाशी संपर्क साधला, पण त्यांना कुठेच बेड उपलब्ध झाला नाही. शेवटी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचे निधन झाले. निधनानंतरही त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कैलास स्मशानभूमीत जागा मिळाली नाही. त्यानंतर कोरेगाव पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here