भुपेंद्रभाई गुजराथी यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या सिनेट सदस्यपदी निवड

सर्वस्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव

चोपडा (संदीप ओली) – येथील चोपडा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष भुपेंद्रभाई गुजराथी यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ,जळगाव च्या सिनेट सदस्यपदी निवड झाली आहे.
भूपेंद्रभाई गुजराथी,यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अधिसभेवर कुलगुरुंनी विद्यापीठ कलम कायद्याच्या महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम २८ (२) (Y) नुसार सिनेट सदस्य पदी नामनिर्देशित केलेले आहे. त्याबद्दल महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र.कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी अभिनंदन केले.
या प्रसंगी चोपडा पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी,चोपडा नगरपरिषदेचे गटनेते जिवनभाऊ चौधरी, मा.उपनगराध्यक्ष राजुभाऊ देशमुख,नगरसेवक हुसेन पठाण,अशोक बाविस्कर अकील जहागीरदार,गोविंद गुजराथी,प्रा.आशिष गुजराथी, मकसुद पठाण,जमील कुरेशी,निपुण गुजराथी,तेज गुजराथी,नितीन पवार,शुभम माळी आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here