जळगाव जिल्ह्यात आज ५१३ रुग्णांची कोरोनावर मात

आज आढळले ७५३ कोरोनाबाधित; जळगाव, अमळनेर, चोपड्यात वाढतोय संसर्ग

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांचा आज (दि.३) स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात ७५३ कोरोनाबाधित आढळून आले आहे. दरम्यान ५१३ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून, ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.सद्यपरिस्थितीत ७ हजार ५०३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज आढळलेल्या ७५३ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर-११५, जळगाव ग्रामीण-१९, भुसावळ-५०, अमळनेर-८७, चोपडा-७४, पाचोरा-३६, भडगाव-४२, धरणगाव-२७, यावल-३८, एरंडोल-९, जामनेर-३८, रावेर-१४, पारोळा-९६, चाळीसगाव-५८, मुक्ताईनगर २७, बोदवड-१८ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ५ असा समावेश आहे.
कोरोनाबाधितांची तालुकानिहाय एकूण आकडेवारी पाहता जळगाव शहर-६६२१, जळगाव ग्रामीण-१५८९, भुसावळ-१६९४, अमळनेर-२५११, चोपडा-२५०७, पाचोरा-११२८, भडगाव-१३२९, धरणगाव-१३८२, यावल-९५०, एरंडोल-१७०८, जामनेर-२२३८, रावेर-१३४६, पारोळा-१५०३, चाळीसगाव-१७७८, मुक्ताईनगर-८१४, बोदवड-४२६ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १६२ असे एकुण २९ हजार ६८६ कोरोनाबाधित आहेत. दरम्यान, ९ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले असून एकूण मृतांचा आकडा ८४० झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here