हिंगोलीत बनावट नोटांच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा

हिंगोली (विशेष प्रतिनिधी) – पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक ०२/०९/२०२० रोजी गुप्त बातमीदाराकडून पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण हद्यीतील आनंद नगर भागामध्ये अरूण हनवते यांचे घरामध्ये भाडयाने राहणारा एक इसम व त्याचे सोबत एक महिला व इतर साथीदार मिळुन ते बनावट नोटा छापुन स्वत: च्या फायदयासाठी त्या नोटा बाजारामध्ये चलनात आणत असल्याचे समजले. तसेच स्वत: जवळ घरात या बनावट नोटा बाळगुन आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधीकारी रामेश्वर वेजने सोबत सपोनि ओमकांत चिंचोळकर व पोलीस कर्मचारी पोकॉ/९३० रूपेश धाबे, पोकॉ/६१७ महेश बंडे, पोकॉ/१००९ अर्जुन पडघन, पोना/८८५ वसंत चव्हाण, मपोशि/९३२ आशा केंद्रे, चापोकॉ/१०८ विजय घुगे दहशतवाद विरोधी कक्ष हिंगोली असे पथकाने सापळा रचल्याप्रमाणे आनंद नगर भागातील अरूण हनवते यांचे घरामध्ये भाडयाने राहणारा एक इसम नामे संतोष जगदेवराव सुर्यवंशी (देशमुख) याचे घरी छापा मारला असता १००, २००, ५००, २००० रू.किमतीच्या नकली नोटा प्रिंट,स्कॅनिंग व झेरॉक्स अशा तिन्ही एकत्रीत सुविधा असणारी कॅनॉन कंपनीची मशिन, नकली नोटा तयार करणेकरीता लागणारे सहित्य तसेच महालक्ष्मी देवी यांचे मुर्ती हया पुरातन कालीन असुन त्या सोन्याच्या आहेत धन सापडले असे सांगुन ग्राहकांना अमिष दाखवून फसवुन करण्याकरीता पिवळसर धातुच्या रंगाच्या महालक्ष्मी देवीच्या १३ मुर्ती व बनावट नोटा, १७,४७,३५०/- रू, खऱ्या नोटा २०,०००/- रू आणि मशीन व इतर नोटा बनविण्याचे इतर साहित्य १७,९७५/- रू प्रिंटर व एक चार चाकी कार किमंत ६,४५,०००/-रू चा मुद्येमाल असा एकुण २४,३०,३२५/-रू मुद्येमाल जप्त करून आरोपी नामे संतोष जगदेवराव सुर्यवंशी (देशमुख) यास अटक करून पो.स्टे.हिंगोली ग्रामीण येथे त्यांचेविरूध्द व छायाबाई गुलाबराव भुक्तार यांचे विरूध्द भादवी कलम ४८९(अ),४८९(ब), ४८९(क),४८९(ड),४८९(ई),४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही उप विभागीय पोलीस अधीकारी श्री. वेंजने व दहशतवाद विरोधी कक्ष, हिंगोली या पथकामार्फत करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here