पनवेल व रायगड जिल्ह्यात 36 रुग्णवाहिका व 16 शववाहिका देण्याची शिवसेनेची मागणी

पनवेल (सहसंपादक ॲड. विष्णु गवळी) – आज शिवसेनेतर्फे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केलेल्या मागणीचे निवेदन ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू गवळी उपशहर प्रमुख महेश खैरनार, सुरेश गोठी त्यांच्या शिष्टमंडळाने राजेश टोपे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. रायगड जिल्ह्यातील लोकसंख्या 26 लाख 34 हजार दोनशे असून प्रत्येक तालुक्याला एक शववाहिका देण्याची मागणी करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे पनवेल परिसरातील सर्व खाजगी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत प्रत्येक रुग्णांना मोफत covid-19 वर उपचार मिळावे तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक खाजगी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत covid-19 वर उपचार देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे पनवेल महापालिकेतील करुणा चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल महापालिकेस आय ए एस दर्जाच्या आयुक्तांची मागणी करण्यात आली आहे. Covid-19 रुग्णांसाठी अत्यावश्यक शिपला फार्मा कंपनीच्या tocilizumb ह्या इंजेक्शन व पेट्रो हेल्थकेअर कंपनीची remdesivir इंजेक्शन पनवेल रायगड नवी मुंबई ठाणे पुणे व राज्यातील सर्व हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्याची मागणी आरोग्य मंत्र्यांकडे करण्यात आली आहे . आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सदर निवेदनाची गंभीर दखल घेऊन पुढच्या शुक्रवारी पनवेल ला भेट देणार असल्याची स्पष्ट करून सर्व मागण्यांचा पाठपुरावा करून पूर्ण करण्यात येतील व सर्व सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here